Search This Blog

Thursday 14 July 2011

बघ माझी आठवण येते का....

बघ माझी आठवण येते का.....

बघ माझी आठवण येते का.....
ओल्या चिंम्ब पावसात भिजताना
थेम्ब थेम्ब ते पावसाचे हातावर झेलताना
भिजले केस तुझे हलुवार पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

कातरवेळी चालताना
एकटे एकटे असताना
एकटक कुठेतरी पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

आरशात निरखून बघताना
आपलच सुंदर रूप पाहून लाजताना
लाजत लाजत हसताना
बघ माझी आठवण येते का.....

चांदराती फिरताना
अबोल संध्येशी बोलताना
तुटता तारा पाहताना
बघ माझी आठवण येते का.....

नको त्या कारणावरुण रुसताना
मुसू मुसू तू रडताना
डोळ्यातले अश्रु पुसताना
बघ माझी आठवण येते का.....

संकटाना सामोरी जाताना
यशाची शिखरे गाठताना
मोकळी वाट चालताना
बघ माझी आठवण येते का.....

मनाला मन जोडताना
क्षण क्षण जगताना
प्रत्येक श्वास घेताना
बघ माझी आठवण येते का.....
बघ माझी आठवण येते का.....

गोष्ट माझ्या आईची..

गोष्ट माझ्या आईची...


शंभर रुपये कमवायला ती
आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट
मी माझ्या हिम्मतवान आईची

माझ्या admission साठी तू
convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती

"माझा मुलगा हुशार आहे
कोणी तरी या सिस्टर ला सांगा"
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून जमुना ,गंगा

दिवाळीत नवीन नसले तरी
स्वच्छ कपडे घालायचे,असे तू सांगितले
स्वाभिमानाने कसे जगायचे
हे आम्हाला शिकवले

चकली चिवडा आवडत नाही
अस मी शेजारी सांगायचो
घरी आल्यावर आपण दोघही
किती ग रडायचो

कौलारू आपल्या घरात पाउस
पूर्ण साम्राज्य निर्माण करायचा
table वर बसून खिन्न डोळे,हसरा चेहरा
कसा मी विसरायचा?

राब राब राबून तू आम्हाला
खूप मोठे केले
सांग आता तुझे
कुठले स्वप्न राहिले

तुझे कुठले हि स्वप्न,इच्छा,आकांक्षा
आता मी पूर्ण करील
नाही जर केले तर
माझ्या आयुष्याला काय अर्थ राहील?

फक्त माझ्या आईसाठी..

फक्त माझ्या आईसाठी...
ही कविता फक्त माझ्या आईसाठी
अग कस सहन केल असशील
मल नऊ महिने घेउन जगण??
तुला रात्रभर जराही झोपू न देता
तुझ्या मांडीवर माझ ते रडण??

आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय
कारण आज मी सपशेल हारलोय
म्हणून परत तुझ्या त्या लढवय्या जीवनाची
स्वत:ला आठवण करुन देतोय
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त
आणि फक्त तुझच आहे...
आत्मा आणि ईश्वर यांचा मेळ म्हणजे आई
हे म्हणतात ते खरच आहे....

मला अजूनही आठवतय
तू मला वीरांची गाथा सांगायचीस
आता वाटतय खरोखर
तोच तू वीर असायचीस

आई तू माझी आजिबात काळजी करु नकोस
आज पडलोय, उद्या उठीन
तूझ्या गोष्टीतल्या त्या वीरासारखा
आणि तू शिकवल्यासारखा फक्त लढीन

तू म्हणायचीस आयुष्यात आधी लढायच
असत आणि मग जिंकायच असत
तू घडविलेला , तुझा हा वीर
तुझी ही शिकवण वाया जाऊ देणार नाही....

आई तुझ्या कुशीत

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥


कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥


कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥


दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

एक इंटरनेट प्रेम कथा... ;

त्या दिवशी तिला,फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला,तिने accept पण केला,आणि आमचा chatting   सुरु झाला....  गेले दिवस चार - पाच...राहू ना गेले मलाच...न वेळ घालवता म्हणालो मी तिला- " I Love You" "आवढतेस खूपच तू - देशील का दिल तुझा, मला तू.... "सुन्न हो.